लोणी प्रतिनिधी : जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संघटनेच्या वतीने लोणी पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले .
राहता तालुका महिला अध्यक्षा रूपाली भालेराव यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात सविता साबळे व बोरुडे ताई यांनी पोलीस निरीक्षक युवराज आठरे साहेब तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहिल्यानगर जिल्हा शहराध्यक्ष गोपाल राऊत, तालुका अध्यक्ष रवी माळवे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, राहता तालुका कार्यकारणी मुख्य सदस्य श्रीपाद बोकंद व सामाजिक कार्यकर्ते सुनील उदावंत उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक युवराज आठरे साहेब, पोलीस अधिकारी विखे साहेब,यांच्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. पोलिसांच्या मनगटावर बांधलेली राखी हा समाज आणि पोलिसांमधील विश्वास व आपुलकीचा धागा ठरला. कर्तव्य बजावताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहावे लागते अशावेळी पत्रकार संघटनेकडून मिळालेली ही प्रेमाची राखी पोलिसांच्या मनाला भावून गेली सण उत्सव रक्षाबंधन भाऊबीज अशा कौटुंबिक आनंदाच्या क्षणापासून दूर राहून समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले पोलीस बांधव हे सतत सुरक्षतेच्या बाबतीत तटस्थ असतात.
लोणी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments