नणंद म्हणजे घरातील सी आयडीच असते.... यशोदेची नणंद तशी नव्हती ती सुनंद होती - गुरुवर्य रामगिरीजी महाराज.

विजय बोडखे राजुरी (वार्ताहार) ननंद आणि भाऊजईचे बऱ्याच ठिकाणी टाळमेळ नसतो.नणंद घरातून गेल्याशिवाय भाऊजई आनंदी होत नाही.नणद म्हणजे सासुबाईचे घरातले सी आयडीच आहे.पटकन जाऊन आईच्या कानात सांगणारी ती नणंद असते.तसे यशोदेची नणद तशी नव्हती तर ती सुनंद होती अशी किर्तनरुपी उद्गार गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी केले. 
 राहाता तालुक्यातील राजुरी येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या प्राणांगणात संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी वरील उपदेश करताना आपले कीर्तन रुपी विचार भाविकांसमोर मांडले.नणंद भाऊजई,सासू यांच्यातील घरातील नाते कसे असते हे विशद करून सांगताना यशोदेची ननंद तशी नव्हती तर ती आजच्या ननंद आणि सासू यांच्यासारखी तशी नव्हती असे ही त्यांनी आपल्या कीर्तनरुपी मार्गदर्शन करताना सांगितले.या अखंड हरिनाम साई चरित्रग्रंथराज पारायण सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताह कालावधीत काकडा,हरिपाठ,सात ते नऊ कीर्तन व यानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन गावातील वाढवाईच भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आलेले होते.शनिवारी सायंकाळी ग्रंथाची विधिवत पूजा करून गावातून मिरवणूक काढून सायंकाळी दीपवंदन करण्यात आले.राजुरी गावातील भजनी मंडळ,युवक मंडळ,गावातील प्रमुख कार्यकर्ते,महिला भगिनी,महिला भजनी मंडळ,राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक,शिक्षिकाया सर्वांचे या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी सहकार्य लाभले.काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.ज्यांनी ज्यांनी या सप्ताहासाठी योगदान दिले अशा सर्व नागरिकांचा सप्ताह कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर ग्रामस्थांच्या वतीने गुरुवर्य रामगिरी महाराज यांचा सत्कार विखे पाटील कारखान्याचे संचालक उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर पठारे,पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.या सप्ताहास ममदापूर नांदूर गोल्हार वाडी बाभळेश्वर निर्मळ पिंपरी तिसगाववाडी, कोल्हार परिसर भजनी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य सात दिवस लाभले आहे.सप्ताह कमिटीच्या वतीने गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. राजुरी गावातील भाविक भक्तांनी धनगरवाडी येथे झालेल्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी मोठ्या संख्येने कार्य करून जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी राजुरी ग्रामस्थांचे व भजनी,युवक मंडळाचे आभार मानले.या सप्ताहास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी भेट दिली. फोटो राहता तालुक्यातील राजुरी येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनरुपी भाविक भक्तांना उपदेश करताना गुरुवर्य रामगिरीजी महाराज 
छायाचित्रात दिसत आहे. (छायाचित्र संतोष गोरे राजुरी)

Post a Comment

0 Comments