दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७- - सोयगाव येथील कै. बाबुरावजी काळे स्कूलचे तंत्रस्नेही शिक्षक प्रणय प्रमोद कुलकर्णी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची, तंत्रज्ञानाचा प्रभावी व सर्जनशील वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञाननिर्मितीला दिलेल्या विधायक दिशेची व कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, चिखली, जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने "समर्थ कार्य गौरव पुरस्कार - २०२६" अंतर्गत “आदर्श युवा तंत्रस्नेही शिक्षक" हा सन्मान दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी कृतज्ञतापूर्वक व गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला.
ज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कार यांचा समन्वय साधत नव्या पिढीला सक्षम, सुसंस्कृत व भविष्यांभिमुख घडविण्याच्या त्यांच्या कार्यास मनःपूर्व्वक अभिवादन ! त्यांच्या या यशाबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई रंगनाथरावजी काळे, सचिव सौ. देविना काळे - भटकर, संचालक शिवदीप रंगनाथरावजी काळे, कोषाध्यक्षा सौ. सुनयना शिवदीप काळे, ज्ञानज्योती बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, बाबुरावजी काळे मराठी स्कूलचे मुख्याध्यापक निलेश पाटील, उपमुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर एलीस व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments