हरेगाव मतमाऊली यात्रेनिमित ऑल इंडिया ख्रिशन फोरमच्या वतीने जनजागृती अभियान ---- अनिल भोसले



संगमनेर --- पंथ सारे विसरून जाऊ ख्रिस्ती सारे एक होऊ या ब्रीदवाक्याखाली ऑल इंडिया ख्रिशन फोरमच्या माध्यमातून देशात ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी देशभरात ख्याती असलेल्या हरेगाव येथील मतमाउली यात्रा सोहळ्या निमित्ताने गेल्या पंधरा वर्षापासून सुरू करण्यात आलेले जनजागृती अभियान यावर्षीही १२ ते १३ सप्टेंबर २०२६ रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया ख्रिशन फोरमचे उपसंचालक अनिल भोसले यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. 

   श्री.भोसले पुढे म्हणाले की,ख्रिस्ती समाजातील विविध क्षेत्रातील समस्या सोडावणुकीच्या दृष्टीने गावपातळी पासून ते देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन सकारात्मक समन्वयाची भूमिका घेऊन एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी फोरमच्या माध्यमातून पुढाकार घेऊन जनजागृती अभिनयाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास साधण्यासाठी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करून त्यांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ठोस पाऊल उचलण्यात येणार येणार आहे, विविध प्रशिक्षण शिबिरातून युवक युवतींच्या सुप्तगुणांना वाव देणे, अन्याय निवारणासाठी प्रयत्न, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, तळागाळातील लोकांमध्ये जागृती करून त्यांच्यामधे नेतृत्व विकास करणे, वर्षभरात राज्यस्तरीय मेळावे, चिंतन शिबिरे व धार्मिक सभेचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
  यावेळी, ऑल इंडिया ख्रिशन फोरमचे संचालक दिलीप नाईक, फा.सतीश कदम,प्रफुल्ल असुरलेकर,माध्यम सल्लागार प्रमुख सालोमन गायकवाड, प्रा.बाबा खरात,अविनाश काळे,आदी मार्गदर्शन करणार आहेत.   
  या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फोरम चे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, चंद्रकांत ऊजागरे,किरण चांदेकर,आंतोन भोसले,सचिन बोरुडे, प्रकाश लोखंडे,आशिष बनसोडे,मार्कस बोर्डे,अजित सुडगे,भाऊसाहेब तोरणे,जेम्स पंडित, डॉ.राजू साळवे, निशिकांत पंडित, सुरेश ठुबे,सचिन रूपटक्के,सुभाष बोधक,विश्वास अमोलिक,विलास पठारे,राजेश दुशिंग,राजेंद्र भोसले,बबलू लोंढे, सुरेश गायकवाड,प्रभाकर चांदेकर,सिमोन रुपटक्के,भाऊसाहेब नेटके,संदीप हिवाळे,विजय त्रिभुवन,आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments