सोयगाव तालुक्यातील औद्योगीक प्रशिक्षण संस्थे जवळील वळणावर उभ्या दुचाकीला भरधाव वेगाने येणारी दुचाकीची धडक, एक ठार, एक गंभीर जखमी ----

-


दिलीप शिंदे 
सोयगाव दि. ०७-- उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना दि.०७ सोमवारी दुपारी पावणे चार ते चार वाजेच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ घडली.
 विलास साईदास राठोड वय (२५) वर्षे रा. वरखेडी तांडा ता. सोयगाव असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून निलेश रोहिदास चव्हाण वय (३५) वर्षे रा.नांदातांडा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, विलास साईदास राठोड व त्याचा मामभाऊ अरविंद रमेश जाधव वय (१५) वर्षे असे दोघेजण पॅशन प्रो,एम एच १९ एक्यू २३५५ या दुचाकीने सोयगाव हून घराकडे जात असताना सोबत असलेल्या अरविंदला लघवी लागल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील वळणावर दुपारी पावणे चार ते चार वाजेच्या सुमारास दुचाकी थांबविली. विलास हा दुचाकीवरच बसून होता तर अरविंद लघवी करण्यासाठी खाली उतरून बाजूला जाताच निलेश रोहिदास चव्हाण वय (३५) वर्षे रा.नांदातांडा हा सोयगाव कडून फर्दापूर कडे स्प्लेंडर प्लस,एम एच १९ एक्यू १२२८ या दुचाकीने जात असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील वळणावर उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला यात विलास राठोड हा जागीच ठार झाला तर निलेश चव्हाण हा गंभीर रित्या जखमी झाला असल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती.अपघातग्रस्तांना १०८ या रुग्णवाहिकेतून सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील यांनी विलास राठोड याची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.तर गंभीर जखमी असलेल्या निलेश चव्हाण याच्यावर डॉ. अजित पाटील व परिचारिका श्रीमती एम आर हिवरडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे रवाना करण्यात आले. दरम्यान अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments