दिलीप शिंदे
सोयगाव दि.१६-- सोयगाव येथील श्री अमृतेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया अध्याशी अधिकारी विलास घुगे ,(सहकार अधिकारी सोयगाव श्रेणी-१) यांचे उपस्थितीत पार पडली. पंकज रगडे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी पतसंस्थेचे माजी चेअरमन विठ्ठल राठोड व अध्यासी अधिकारी विलास घुगे यांनी नवनियुक्त चेअरमन पंकज रगडे यांचा सत्कार केला.
दरम्यान शिक्षक सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख दिवाकर चोपडे, भास्कर चौधरी, अनिल निकम, राजेश जंजाळ, गोपाल चौधरी, हरिदास काटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. सोयगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील,माजी चेअरमन शकूर शेख, व्हाईस चेअरमन दुर्गादास बलांडे, मानद सचिव संदीप चौधरी, सहकार पॅनलचे संचालक संतोष वाघ ,संदिप सोनवणे ,रघुनाथ काटोले तसेच संस्थेचे कर्मचारी प्रमोद जाधव, रमेश वामने हे उपस्थित होते. भास्कर चौधरी व चोपडे, पतसंस्थेचे माजी संचालक चेअरमन यांनी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अक्षय धंदर ,लिपिक भिकन पाटील यांनी नवनियुक्त चेअरमन यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून सभासद व पतसंस्था हितासाठी काम करण्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जेष्ठ शिक्षक भिमराव सुरवाडे, प्रशांत पाटील हे उपस्थित होते.
0 Comments