लोणी प्रतिनिधी :- (रूपाली भालेराव ) राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील साई सेवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने यंदाही गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आगळ्यावेगळ्या पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवातही विविध नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साई सेवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष शब्बीर इनामदार सर आणि त्यांच्या पत्नी सीमा शब्बीर इनामदार तसेच सहभागी सर्व मंडळामध्ये कार्यरत असणारे सभासद व सचिव यांच्या सहयोगाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने पारंपारिक पद्धतीने शाडू मातीचा गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून परिसरातील प्रामुख्याने महिला आणि छोट्या मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते.
यामध्ये प्रामुख्याने गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणेशमूर्ती सजावट स्पर्धा, आरस स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा तसेच गौरी गणपती विसर्जन निमित्ताने ज्येष्ठ महिला व आजींचा सन्मान यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपाली भालेराव पुण्यनगरी वृत्तपत्र पत्रकार तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना राहता तालुका अध्यक्ष , ज्ञानेश्वर साबळे व स्वराज्य पोलीस पत्रकार संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा शहरअध्यक्ष गोपाल राऊत यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांना गौरविचिन्ह, रोख रक्कम व पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या लोकाभिमुख गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन घडवून आणणे, सर्व धर्मीयांना एकत्र आणून संवाद साधणे आणि समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवून समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे, या प्रमुख उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सपूर्ण नियोजन व कार्यक्रम पार पडला. सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे उपअध्यक्ष प्रमोद गाडेकर, सचिव सोमनाथ वाकचौरे, कार्याध्यक्ष किरण गाडेकर, सह-कार्याध्यक्ष राहुल वाकचौरे ,आकाश रोहिदास, प्रकाश बागले, विनोद सातपुते, अभिजित काशीद, विकास घोलप यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडला यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिला आघाडीच्या सुनंदा गाडेकर, संगीता निघूते, सीमा इनामदार, सुरेखा सोनवणे, आश्विनी शिरसाठ, रुपाली गाडेकर, वैशाली वाकचौरे रेश्मा काशीद, प्राची नवले रुतुजा सोनवणे, कार्तिकी सोनवणे, स्वाती कोमरे, साधना वर्पे आदी महिला कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या भव्य गणेशोत्सवात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अत्यंत उत्साहात पार पडले. यामध्ये गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धेत ( छोटा गट ते ४थी गट) अनुष्का सिरसाठ, दक्ष वर्पे, श्रावणी विश्वे, यश वाघ, प्रसिद्धी गाडेकर आणि सर्वेश बागल यांनी यश संपादन केले. तसेच गणेश आरस व सजावट रंगभरण स्पर्धेत (5 वी ते 7 वी गट) वेदिका गजर, कल्याणी विश्वे, मधुरा विश्वे, आमीरन शेख, दिव्यानी विश्वे व वेदीत गजर यांनी बाजी मारली. क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये आरुष धोलप (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक), हर्षल गाडेकर (उत्कृष्ट यष्टिरक्षक), अव्हेन तांबे (उत्कृष्ट फलंदाज ), मयंक वाकचौरे (उत्कृष्ट गोलंदाज) आणि जी जीकरा इनामदार ( सामनावीर) यांना गौरवण्यात आले. गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित 'नारी सन्मान ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव' सोहळ्यात वाणी आजी, काशीद आजी, दुधाडे आजी, मातेरे आजी, कुमकरआजी, शिरसाट आजी, वाकचौरे आजी, बागले आजी, सातपुते मावशी आणि तांबे आजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. परिश्रम कष्ट जिद्द वेदना सुखदुःख यांचा मेळ साधून संसार व संस्कार करणे हे आजच्या परिस्थितीत फार महत्त्वाचे आहे . पिढीकडून नव्या पिढीने घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे बरेचसे संस्कार आपले जीवन कार्यक्षम बनवतात. आधीच्या पिढीत वावरणाऱ्या सर्व आजींचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.याशिवाय रांगोळी स्पर्धेत स्वातीताई कोपरे, सुनंदाताई गाडेकर, कल्याणी विश्वे, निघूते ताई व घोलप ताई यांनी प्राविण्य मिळवले. आरस व उत्कृष्ट सजावट स्पर्धेत विश्वे सविता, गाडेकर किरण / रुपालीताई, निघूते, वाणी / सोनवणे भाग्यश्री( विभागून) रॉय सर आणि कुमकर (विभागून ) यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिलांचा सहभाग व उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला. उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला. मंडळाचे उपअध्यक्ष प्रमोद गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात या भव्य गणेशोत्सवाची सांगता झाली.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी -- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments