अपुऱ्या पावसामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती! सरकारने तातडीने दुष्काळ करावा जाहीर-- बाळासाहेब चव्हाण


 
शिर्डी(प्रतिनिधी )- अहिल्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अपुऱ्या पावसामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेळ काढूपणा न करता तातडीने दुषकाळ जाहिर करावा‌ अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेसंचे जिल्हा सरचिटणिस ( शरद पवार गट ) बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ५ ऑक्टोबरला दुष्काळ जाहिर करू असे सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात आज गंभीर परिस्थिती असतांना मूहूर्त पाहण्याची गरज नाही. कर्नाटक सरकारने २८ ऑगष्टलाच दुष्काळ जाहिर करून केंद्र सरकार कडे मदत मागितली आहे. महाराष्ट्र सरकार काय परतीच्या पावसाची वाट बघून चालढकल करत आहे का? सध्या जिल्ह्यात चारा टंचाई, पाणी टंचाई, वीजेचा लपंडाव ,शेतमजूरांना रोजगाराचा प्रश्न ,विमा कंपन्यांची शेतकरी वर्गाबाबद असलेली अनास्था विचारात घेता निर्बंध शिथील करणे. असे गंभीर प्रश्न आहेत. दुष्काळ जाहिर करण्यास विलंब झाला तर शेतकरी पूर्णपणे उध्दस्त होईल. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहिर करावा. अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेसंच्या वतीने जिल्हाभर धडक आंदोलन करण्यात येईल. असेही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चव्हाण, पुणतांबा यांनी स्पष्ट केले.

 असून दुष्काळा मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून जलसंधारणाची कामे चालू करावी. पशुधनाला चाऱ्या बरोबरच दूध उत्पादकांच्या दुधाला भाव वाढ द्यावी‌ बँकेची कर्जमाफी सरसकट दोन लाखापर्यंत करावी. फळबाग व सोयाबीन मका कपाशी व इतर पिके कामातून गेली आहे .त्या संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत. काही ठिकाणी पाणी आहे तर वीज नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्या विजेच्या संदर्भात निर्णय घ्यावा. अशा मागण्याही बाळासाहेब चव्हाण यांनी केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments