पुणतांबा- रस्तापूर येथील शेतकऱ्यांनी दुष्काळ पंचनामा करण्यासाठी या मदत केंद्राचा घ्यावा लाभ--बाळासाहेब चव्हाण

शिर्डी( प्रतिनिधी)- 
शासनाने सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात पंचनामे करण्यात येत असून राहता तालुक्यातील पुणतांबा रस्तापूर गावातील सर्व खातेदार शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतकरी दुष्काळ पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यासाठी मदत व्हावी म्हणून दुष्काळी पंचनामा मदत केंद्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चव्हाण यांनी पुणतांबा येथे नुकतेच सुरू केले असून येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी दुष्काळ पंचनामा करण्यासाठी काही अडचणी असल्या तर मदतीसाठी या केंद्राचा लाभ घ्यावा. असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राहता तालुक्यातील पुणतांबा रस्तापूर गावातील सर्व खातेदार शेतकरी बंधू भगिनींनो दुष्काळी पंचनामे दिनांक 28 सप्टेंबर 2026 ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आठ अ, आधार लिंक ,बँक पासबुक ,आधार कार्ड, फार्मर आयडी नोट कॅम्प मधील फोटो तसेच आधार कार्डवर मोबाईल नंबर नमूद करून ग्रामपंचायत कार्यालय पुणतांबा येथे सकाळी दहा ते चार या वेळेस जमा करावी. महत्त्वाचे म्हणजे या दुष्काळ पंचनामासाठी वेळ फार कमी असल्यामुळे आपण तसेच आपल्या आजूबाजूला असलेले शेतकरी तसेच बाहेरगावी असलेले शेतकरी, आपल्या परिचयाचे शेतकरी, यांनाही हा संदेश द्यावा व दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला या दुष्काळ पंचनामे करण्यासाठी सहकार्य करावे. काही अडचणी असल्यास सहाय्यक अधिकारी सौ वैशालीताई पुंड व श्री किरण धुमाळ साहेब यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. या शेतकरी दुष्काळ पंचनामा मदत केंद्राच्या उद्घाटन वेळी साहेबराव शिंदे, प्रा. डॉक्टर बखळे सर, अनिलभाऊ नळे, नितीन भगत, अशोक धनवटे, दिपक धनवटे, सोपानराव धनवटे, निवृत्ती जगदाळे ,अजय जोशी, सुरेश जगदाळे, सोपान शिंगवेकर, दत्तात्रेय फलके, सुनील थोरात, अशोक चव्हाण, अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या मदत केंद्राचा शेतकरी लाभ घेत आहेत.

Post a Comment

0 Comments