धन दौलत पेक्षा माणुसकी कामी येते... अविनाश गलांडे(जि. परिषद अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर)ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न



दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: आयुष्यातून जाताना आपल्या सोबत काही येत नसून धन दौलती पेक्षा माणुसकीच कामी येते. छत्रपती शिवरायांनी आपल्या गुरूंच्या उपदेशाने यशस्वी मार्गक्रमण करत इतिहास घडविला. जीवनामध्ये आपल्याला सद मार्ग दाखवण्यासाठी सद्गुरु शिवाय पर्याय नाही असे उद्गार छ. संभाजी नगरचे जि. परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी काढले.

 ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान च्यावतीने आयोजित अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील सेवार्थींना प्रमाणपत्र वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,कार्यक्रम प्रसंगी अविनाश गलांडे बोलत होते.
     याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे होते. तसेच व्यासपीठाव माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, पुणे येथील संत साहित्य अभ्यासक दत्तात्रय गायकवाड, अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष परदेशी, ह. भ.प.दत्तात्रय बहिरट महाराज, ह भ प राधेश्याम पांडागळे महाराज, श्रीरामपूरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन, मा. प्राचार्य जयकर मगर, ह भ प रवींद्र महाराज मुठे, कुलकर्णी महाराज, दर्यापूरकर महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
    याप्रसंगी ह भ प माणिक महाराज मोरे महाराज बोलताना म्हणाले की माणसाने निसर्गाची हानी करू नये, निसर्ग अबाधित राहिला तर आपण टिकू असे सांगितले, मोबाईल मुळे माणसाचे नातेसंबंध मित्रपरिवार दुरावले असून पालकांनी मुलांची विशेष मोबाईल संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्या भाषणातून छत्रपती संभाजी नगर हा त्याग व बलिदानाचा जिल्हा असून छत्रपती संभाजी राजांचे कार्य आम्हाला सदैव प्रेरणा स्रोत असे आहे असून अहमदनगर जिल्हा हा संतभूमींचा जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रास्ताविक मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले. यावेळी प्रा.संतोष परदेशी, प्राचार्य जयकर मगर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील २५० सेवार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. व तदनंतर शैक्षणिक, सामाजिक, कला सांस्कृतिक, उत्कृष्ट शासकीय सेवा ,कृषी भूषण , आदर्श पशुपालक, आदर्श माता पिता,आदर्श सरपंच , आदर्श उपसरपंच ,स्वच्छ व सुंदर शाळा, उत्कृष्ट महाविद्यालय आदी सह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर, संस्था यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील ह भ प, प्रवचनकार, कीर्तनकार, विविध गावांचे भजनी मंडळ महिला ,पुरुष, माता बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे व संगीता ताई फासाटे यांनी केले. सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, सुदाम पटारे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, भैया पठाण, सुरज गलांडे, सुजित बोडखे, पत्रकार रवींद्र पवार,प्रा. विनीत भोसले, संजय पवार,सुरेश गलांडे सर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments