राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. येथिल युवा उद्योजक प्रशांत सुनीलराव झुरळे.पा यांनी या सीसीटीव्ही कॅमेरे क्षेत्रात लक्ष दिले.व जिद्द ,चिकाटी, आणि आपल्या महेनतीच्या जोरावर ते गेल्या सहा ते सात वर्षांपासून आपला त्रिनेत्रा इंटरप्राईजेस सीसीटीव्ही सेल्स आणि सर्व्हिस तर्फे हा व्यवसाय करत आहेत.
त्यांनी या व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. त्यांचे या क्षेत्रात मोठे नाव झाले आहे. वाड्या, वस्त्यांवर अनेक दुकानात, घराघरात, परिसरात, गावागावात, अनेक सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी लावले असून त्यामुळे सुरक्षितता निर्माण झाली आहे.
आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या सावळीविहीर गावांमध्ये नगर मनमाड महामार्गाच्या कडेला आगलावे कॉम्प्लेक्स येथे CCTV चे सेल्स आणि सर्व्हिस चे भव्य असे शोरूम व डेमो सेक्शन उभारले असून त्याचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सावळीविहीर मधील वाढती गुन्हेगारी,चोरी गावाच्या सुरक्षिततेचा पाया कशा प्रकारचे पक्का करता येईल व आपले सावळीविहीर बु. गावातील सर्व नागरीक कशाप्रकारे सुरक्षित होतील. या वर त्यांनी अभ्यास केला .व आज पासून आपल्या गावासाठी सुरक्षा पुरवण्याचे काम या दुकानाच्या माध्यमातून हाती घेतले.आज गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या त्रिनेत्रा एंटरप्राइजेस शोरूमच्या उद्घाटनाचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
सावलीविहीर गावचे सरपंच श्री ओमेश साहेबराव जपे , श्री बाळासाहेब जनार्दन जपे ,श्री शांताराम जपे, श्री गणेश कापसे, श्री गणेश आगलावे श्री.भाऊसाहेब जपे , श्री.शांताराम जपे
श्री राजेंद्र वाबळे श्री सचिन रमेश आगलावे श्री दत्तात्रेय आगलावे श्री नवनाथ जपे श्री जीजाबा आगलावे श्री गायकवाड सर श्री शरद मुदगुल श्री सदाशिव कापसे श्री किरण आगलावे. श्री चैतन्य कुलकर्णी श्री प्रशांत कोठारी श्री दिलिप कापसे श्री भारत जपे , पत्रकार राजेंद्र गडकरी,
शिवाजी आगलावे यांचे उपस्थितीच्या या दुकान चे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी सरपंच ओमेश जपे व बाळासाहेब जपे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी प्रशांत तसेच सुनील झुरळे यांना भेटून दुकाना साठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा सत्कार केला.
0 Comments