सर्वांच्या आरोग्य, सुख ,समृद्धी, राष्ट्र कल्याण आणि सनातन धर्माच्या उन्नतीसाठी हरिद्वार येथे गंगा स्नान करून प्रार्थना करण्यात आल्याचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले असून गंगा मातेच्या महिमेचे स्मरण करून जीवनशुद्ध ,सात्विक आणि धर्मनिष्ठ ठेवण्याचा संदेश या निमित्ताने हभप मच्छिंद्र महाराज इंगळे यांनी हरिद्वार येथून दिला आहे.
श्री नर्मदेश्वर संन्याशी आत्मारामगिरीजी ट्रस्ट आयोजित महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन, साधना व अध्यात्मिक जप,तप करत जनसामान्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिद्वार येथे या तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले असून हरिद्वार येथे पवित्र श्री मायादेवी घाटावर, हरी की पौडी येथे .
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी या हरिद्वार तीर्थयात्रेच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पवित्र वातावरणात गंगामातेचे स्मरण करून गुरुवारच्या दिवसाची मंगल सुरुवात झाली . त्यानंतर हरिद्वार येथील पवित्र माया देवी घाटावर गंगा मैयाचे विधिवत पूजन, आरती व पुण्यस्नान करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, गंगामातेचा जयघोष आणि हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण घाट भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
गंगामातेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून सर्वांच्या आरोग्य, सुख, समृद्धी, राष्ट्रकल्याण आणि सनातन धर्माच्या उन्नतीसाठी प्रार्थना करण्यात आली. असे संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले . या प्रसंगी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज इंगळे यांनी गंगामातेच्या महिमेचे स्मरण करून जीवन शुद्ध, सात्त्विक आणि धर्मनिष्ठ ठेवण्याचा संदेश दिला.
माया देवीचे दर्शन घेऊन आदिशक्तीच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यात आले. देवीच्या कृपेने सर्व भक्तांना आध्यात्मिक शक्ती, सद्बुद्धी आणि धर्मसेवेची प्रेरणा लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
आजचा गुरुवारचा संपूर्ण दिवस भक्ती, साधना, दर्शन, पूजन आणि गंगामातेच्या कृपाआशीर्वादाने अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय ठरला. या पवित्र तीर्थयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी गंगा मैयाच्या कृपेचा दिव्य अनुभव घेतला.व इतर साधक व भाविकाच्या सुख-समृद्धी तसेच सनातन धर्माच्या उन्नतीसाठी , राष्ट्र हितासाठी-
॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥
हर हर गंगे! हर हर महादेव असा पवित्र गंगा किनारी जयघोष करत प्रार्थना करण्यात आली. असे श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत जुना आखाड्याचे संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले.
0 Comments