अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेच्या( उबठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. राहता तालुका शिवसेना (उबाठा )गट तालुकाप्रमुख म्हणून सावळीविहीर येथील संदीप रमेश विघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आले आहे.
संदीप विघे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पूर्वीपासून निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांनी सावळीविहीर शहर शाखा प्रमुख तसेच गटप्रमुख त्याचप्रमाणे युवा सेना तालुका प्रमुख म्हणून व अहिल्यानगर उत्तर जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्याचप्रमाणे ते निष्ठावान शिवसैनिक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. रक्तदान शिबिरे वृक्षरोपण तसेच नवरात्री, गणेश उत्सव तसेच श्री म्हसोबा महाराज यात्रा आदी अनेक सण, उत्सव, यात्रा या धार्मिक उत्सवात तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल आदींना नेहमी त्यांचे विविध प्रकाराने सहकार्य असते. तसेच ते पक्षाचे निष्ठावान असून पक्ष वाढवण्यासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन व शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता व तालुक्यात शिवसैनिकांना संघटित करण्याचा सातत्याने मोठा प्रयत्न करणारे संदीप विघे यांची शिवसेना (उबाठा) पक्षाने राहाता तालुका शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच अहिल्यानगर शिवसेना (उबाठा)-गटाचे जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कोते ,नानाभाऊ बावके व सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शिवसैनिकांनी त्याचप्रमाणे नागरिकांनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
0 Comments