अहिल्यानगर, समाजहित महासंघ, महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित केली होती.यामध्ये शासकीय सेवेत निवड झालेल्या समाज बांधव तसेच दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने गोपाळ समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात गोपाळ समाजाचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते शासकीय सेवेत निवड झालेल्या समाज बांधवांचा तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात गोपाळ समाजहित महासंघाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सर्वानुमते काशिनाथ गिरे यांची तालुका अध्यक्ष, विलास गिरे यांची तालुका उपाध्यक्ष, अनिल भास्कर गिरे यांची तालुका युवक अध्यक्ष, सुनील गिरे यांची तालुका युवक उपाध्यक्ष, प्रताप पवार यांची सचिव, संतोष पवार यांची सहसचिव, प्रदीप जाधव यांची तालुका संपर्कप्रमुख, सुखदेव पवार यांची कोषाध्यक्ष तसेच संजय पवार यांची खजिनदार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य गोपाळ समाजहित महासंघ तसेच अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राहाता तालुक्यातील गोपाळ समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील युवकांना संघटित करून शिक्षण, रोजगार, सामाजिक एकात्मता आणि समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित समाज बांधवांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments