भोकर येथे ज्ञानेश्वरी पारायण अखंडहरीनाम सप्ताहव कथामृत सोहळ्यास उत्साहात आरंभ,



टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे संत शिरोमनी संत सांवता महाराज संजीवन सोहळा व संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमीत्ताने आयोजीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरीनाम सप्ताह व सांवता मतहाराज चरीत्र कथामृत सोहळ्यास मोठ्या उत्साहात आरंभझाला असून येथील कथा सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहुनलाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे. किर्तनाने सांगता होत आहे.

भोकर येथील संत सांवता महाराज मंदिर येथे नेवासा येथील वै. गुरूवर्य बन्सी महाराज तांबे, श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती महंत, शांतीब्रम्ह, गुरूवर्य भास्करगीरीजी, श्रीक्षेत्र देवगडचे गुरूवर्य स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज, श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत, गुरूवर्य रामगीरीजी महाराज, संत सांवता महाराज यांचे 17 वे वंशज गुरूवर्य रविकांत महाराज वसेकर व भोकर येथील श्री वैष्णव सेवाश्रमाचे मठाधिपती गुरूवर्य साहेबराव महाराज कांगुणे यांचे कृपाशिर्वादाने तसेच भोकर येथील विठ्ठल सेवा आश्रमाचे मठाधिपती सुदाम महाराज चौधरी, भागवताचार्य संतोष महाराज पटारे, श्रीक्षेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती स्वामी अरूणनाथ गीरीजी महाराज, येथील शिवकृष्ण सेवाधामचे मठाधिपती भागवताचार्य कु. आरतीताई शिंदे महाराज व कीरण महाराज हराळे यांचे अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात आरंभ झाला आहे.
     यात मंगळवार दि. 04 ऑगष्ट पासून सुरू झालेल्या या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे 4 वा. काकड, आरती व भजन, सकाळी 7 वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, दुपारी 2 वा. संत शिरोमणी सांवता महाराज चरीत्र कथा, सायंकाळी 6 वा. हरीपाठ, रात्री 9 वा. जागरण व नामजप नंतर जागर याप्रमाणे सोहळासंपन्न होत आहे. व्यासपिठ चालक म्हणून येथील सुदाममहाराज चौधरी व निवृत्ती महाराज विधाटे हे सेवा करत आहेत. यासोहळ्यात मंगळवार दि. 4 ऑगष्ट पसून ते दि. 10 ऑगष्ट या दरम्यान दररोज दुपारी 2 वाजता संत शिरोमणी सांवता महाराज चरीत्र
     कथामृत होत असून कथा प्रवक्ते म्हणून श्रीक्षेत्र ऋषीकेश येथील आचार्य एकनाथ महाराज वाबळे हे सेवा करत आहेत. सोमवार दि. 10 ऑगष्ट रोजी विठ्ठल सेवाश्रमाचे मठाधिपती सुदाम महाराज चौधरी यांचे जाहीर हरी किर्तन होत आहे तर मंगळवार दि. 11 ऑगष्ट रोजी रोजी सकाळी 8 वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ व संत शिरोमणी सांवता महाराज यांचे प्रतिमेची मिरवणुक होत आहे. त्यानंतर सकाळी 10 वा. आचार्य एकनाथ महाराज वाबळे यांचे काल्याचे किर्तन व तद्‌नंतर महाप्रसादहोत आहे. या महाप्रसादाचे अन्नदान येथील किशोर पाराजी अभंग हे करत आहेत.
     येथे निवृत्ती महाराज विधाटे व सौ. रखमाबाई निवृत्ती विधाटे या जेष्ठ दाम्पत्याचे हस्ते विधीवत पुजन करून या सोहळ्यास आरंभ करण्यात आला. या वेळी पौराहित्य योगेश दंडवते यांनी केले या वेळी सुदाम महाराज चौधरी, निवृत्ती महाराज विधाटे, सोसायटीचे चेअरमन निलेश विधाटे, नानासो शिंदे, मोहन पांढरे, संजय शिंदे, नानासाहेब विधाटे, गोरख चव्हाण, नामदेव पटारे, उत्तम लोखंडे, राम न्हावले, शाम न्हावले, संजय लोखंडे, नामदेव तागड, डॉ मछींद्र शिंदे, राजेंद्र विधाटे, गयाबाई शेळके, कल्पना आसावा, सुमन विधाटे, रंगनाथ काळे, पोपट वाकडे, गोरख वाकडे, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहबे वाणी, संगीता लोखंडे, न्हावलेताई, सुशिलाबाई काळे, सौ. रखमाबाई विधाटे, आण्णासाहेब विधाटे, गोरख शिंदे, सुनिल शिंदे, देवीदास धने आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.
     येथील संत सांवता महाराज मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ व आयोजक संत सांवता महाराज तरूण मंडळ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments