श्री साई सतचरित्र पारायण परीक्षा- 2026 साठी उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांच्याकडून पाच लाख रुपयांची देण्यात येणार विविध बक्षिसे!

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 13 ऑगस्ट पासून श्री साई सत चरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होत असून मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही श्री साई सच्चरित्र पारायण परीक्षा- 2026 आयोजित केली आहे. या परीक्षेत गुणवत्ता पात्र साईभक्त वाचकांना उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांच्याकडून पाच लाख रुपयांची विविध स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहे. 

तरी या श्री साई चरित्र पारायण सोहळ्यात व श्री साई चरित्र पारायण परीक्षेमध्ये सर्व वाचक साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन या श्री साईसत चरित्र पारायण परीक्षा आयोजक रवींद्र जोशी यांनी म्हटले आहे. 

 या संदर्भात रवींद्र जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच मागील वर्षी श्री साई चरित्र पारायण परीक्षा आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते तसेच साईभक्त विजय तुळशीराम कोते यांनी बक्षीसे दिली होती. यावर्षीही श्री साई चरित्र पारायण परीक्षा घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यासाठी बक्षीसांचे आयोजक महत्त्वाचे होते. मात्र श्री साईबाबांच्या कृपेने उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांना हा विषय समजताच त्यांनी या परीक्षेसाठी सुमारे पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तीन ऑगस्ट रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व कैलास बापू कोते, कमलाकर कोते, सचिन तांबे, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी पाच लाख रुपये श्री साई चरित्र पारायण परीक्षेसाठी दिले आहे. त्यांचा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला. असे सांगत या पारायण परीक्षांमध्ये दररोज जे अध्याय वाचन होणार त्यातून ऑनलाइन प्रश्न विचारले जाणार आहेत . रात्री नऊ ते दहा या वेळेत ऑनलाईन प्रश्न विचारले जाणार असून अर्ध्या तासात निकाल जाहीर करण्यात येणार आहे. व दुसऱ्या दिवशी बक्षीसे देण्यात येणार आहे.त्याचे योग्य उत्तर आलेल्यांना ही बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षीसांची तयारी सुरू झाली असून विजयी वाचक साई भक्तांना ट्रॉफी, सर्टिफिकेट, श्री साईंचे चांदीचे नाणे, श्री साईंची चांदीची मूर्ती, तसेच ब्रांच, पितळाचे दिवे, आदी बक्षिसे विजयी वाचक साई भक्तांना देण्यात येणार आहे. महिला वाचक साई भक्तांना 21 तर 21 पुरुष वाचक साई भक्तांना तर‌ दहा उत्तेजनार्थ अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.त्यासाठी उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी पाच लाख रुपये देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. ते निस्सिम साईभक्त असून त्यांचा संपूर्ण परिवार साईभक्त आहे साईबाबांच्या कृपेने त्यांना ही साईबाबांनी बुद्धी दिली .त्यांचे रवींद्र जोशी यांनी यावेळी आभार मानले. श्री साई सच्चरित्र पारायण नुसते वाचण्यासाठी नाहीतर या ग्रंथातील अध्यायांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ आहे. त्यासाठी अधिकाधिक मन लावून हा ग्रंथ वाचकांनी वाचावा यासाठी या परीक्षेचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी बोलताना उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी म्हणाले की, श्री साई चरित्र पारायण परीक्षेसाठी माझ्याकडून बक्षिसे दिली जाणार असले तरी ही साईंचीच कृपा आहे. त्यातून मला श्री साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. यापुढे असे सहकार्य कायम मी श्री साई कृपेने नक्कीच करीत राहील. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.व श्री साई चरित्र पारायण सोहळा व या पारायण परीक्षा 2026 मध्ये सर्व पारायण वाचकांनी सहभाग घ्यावा. असे आवानही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments