अध्यात्मिक ज्ञान, साधना व दर्शनासाठी महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचा हरिद्वार दौरा!

शिर्डी ( प्रतिनिधी)-श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत व जुना आखाड्याचे संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचा हरिद्वार तीर्थयात्रा दौरा नुकताच मोठ्या श्रद्धेने आजपासून सुरू झाला आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांची भेट व प्रसाद घेऊन या अध्यात्मिक दौऱ्याला मंहत आत्मारामगिरीजी महाराजांची सुरुवात मोठ्या भक्तीमय वातावरणात व हर हर महादेवचा जयघोष करत सुरू झाली आहे.


मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट 2026 रोजी श्रीक्षेत्र निर्मळ पिंपरी येथून कोपरगाव बेट येथे श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात परमपूज्य रमेशगिरी महाराजांची भेट घेऊन व प्रसाद घेऊन दुपारी २:०० वाजता कोपरगाव रेल्वे स्थानकावरून ऋषिकेश एक्सप्रेसने महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराजांचा या हरिद्वार तीर्थयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले की, ईश्वरकृपेने व सद्गुरूंच्या आशीर्वादाने ही तीर्थ यात्रा नुसती तीर्थयात्रा किंवा भेटी देण्यापूरती मर्यादित नसून हि तीर्थयात्रा भक्तिभाव, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा अविस्मरणीय अनुभव देणारी ठरणारी आहे. अध्यात्मिक ज्ञान व साधना प्राप्त करणारी ही यात्रा आहे. या तीर्थयात्रेचा रेल्वेने प्रवास असून कोपरगाव येथून 4 ऑगस्ट रोजी दुपारी रेल्वेने बसल्यानंतर 
बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०:०० वाजता हरिद्वार येथे पोहोचण्याचे नियोजन असून, तेथून श्री पंच दशनाम जुना आखाडा अथवा हरिहर आश्रम, पूज्यपाद स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या पवित्र आश्रमात रात्री सुमारे ११:०० वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आश्रमात मुक्काम करून दुसऱ्या दिवसापासून तीर्थदर्शनास प्रारंभ होणार आहे.
दिनांक ६, ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हरिद्वारमधील विविध पवित्र देवस्थाने, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यात येईल. यामध्ये विशेषतः श्री मायादेवी शक्तीपीठ, श्री.मनसादेवी, श्री चंडिका देवी, कणखल, श्री आनंद भैरव मंदिर तसेच परिसरातील विविध देवी-देवतांची मंदिरे, आश्रम, प्राचीन देवस्थाने आणि हरिद्वारचे पावन घाट यांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेण्यात येईल. गंगामातेच्या पवित्र तीरावर स्नान, संध्याकाळची दिव्य गंगा आरती, संत-महात्म्यांचे दर्शन, आश्रमातील आध्यात्मिक कार्यक्रम आणि सत्संग यांचा लाभ घेऊन यात्रेला अधिक आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त होईल. या दरम्यान हरिद्वार येथे प.पू.आचार्य स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, प.पू. स्वामी
महंत हरीगिरीजी महाराज यांचीही भेट व दर्शन होणार आहे.आणि अध्यात्मिक अशी चर्चा होणार असून तदनंतर त्यांच्या शुभ आशीर्वादासह तीर्थयात्रेचा परतीचा प्रवास होणार आहे.ही संपूर्ण हरिद्वार तीर्थयात्रा केवळ प्रवास नसून श्रद्धा, भक्ती, साधना आणि सनातन संस्कृतीचा दिव्य अनुभव देणारी आध्यात्मिक यात्रा असून गंगामातेचे पावन दर्शन, मायादेवी शक्तीपीठ, आनंद भैरव मंदिर, हरिहर आश्रम, श्री पंच दशनाम जुना आखाडा तसेच विविध देव-देवतांचे दर्शन यांमुळे जीवनात नवीन आध्यात्मिक ऊर्जा, शांती आणि ईश्वरभक्तीची प्रेरणा लाभेल. ही यात्रा सर्वांच्या जीवनात मंगलमय, कल्याणकारी आणि चिरस्मरणीय ठरो, असे संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी यावेळी म्हटले आहे‌. कोपरगाव रेल्वे स्टेशनवर महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराजांचे साधकांनी व भाविकांनी दर्शन करत तसेच भ्रमणध्वनीद्वारे या सफल यशस्वी तीर्थयात्रेसाठी भोलेनाथाकडे हरहर महादेव असा जयजयकार करत व प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या आहेत. महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराजांचा हा अध्यात्मिक तीर्थयात्रा दौरा 11 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे.

Post a Comment

0 Comments