दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३--जारूळ ताम्हण या वृक्षाचे फुल हे महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प व हरित मान चिन्ह आहे. या वृक्षाच्या प्रसार व संवर्धनासाठी गत पाच वर्षापासून राज्यभर कार्य करणारे सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.संतोष पाटील हे "एकच लक्ष ,प्रत्येक शाळेत राज्यपुष्प वृक्ष "हा उपक्रम राबवत आहे.
यात प्रत्येक शाळेत जारूळ ताम्हण वृक्षाचे रूप लावण्यात येत आहे. डॉ.पाटील यांनी या वृक्षाची माहिती व महत्त्व विशद करणारे क्यू आर कोड बनवले असून जेथे वृक्ष लावलेला आहे त्या ठिकाणी हे क्यू आर सी स्टिकर लावण्यात येत असून ते स्कॅन केल्या बरोबर मोबाईल मध्ये याची माहिती उपलब्ध होते. या वृक्ष रोपण अभियाना अंतर्गत २०२६ या वर्षी गायरानवाडी, प्रतापवाडी , शिवेश्वर वाडी,मल्हारवाडी ,( पी एम श्री.)केऱ्हाळा ,पाडळी ,वाडी मोहनदरी -, सराटी ,सिल्लोड , शिवेश्वर वाडी,चिंचोली ,वाडी , कानोबावाडी इत्यादींसह सिल्लोड ,फुलंब्री, कन्नड, सोयगाव तालुक्यातील १८ शाळांमध्ये राज्य पुष्प वृक्षाचे रोपण करण्यात आले. डॉ. पाटील यांचा स भु पत्रिका या विशेषांकात "आपले राज्य पुष्प जारूळ "हा विशेष लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचे वाचन ही या शाळांमध्ये घेण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक शाळेत राज्य पुष्प वृक्ष रोपण सुरू असून हा जिल्हा राज्यातील असा उपक्रम राबवलेला पहिला व एकमेव जिल्हा असणार आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी धीरज राजपूत, प्रदीप बिडकर, समता कडू ,सरस्वती पालोदकर, मोहिनी दुरोळे, संजय बागुल , संदीप ढेपले ,राहुल पवार , मु.अ.रामचंद्र मोरे , दत्तात्रय चव्हाण, चोरमले, सूर्यवंशी इत्यादी जिल्हा परिषद प्रशालेच्या विविध गावातील शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले असून उपरोक्त वृक्षाचे संगोपनाचे पालकत्व स्वीकारले आहे.
0 Comments