राहता तालुका शिवसेनेच्या( उबाठा) तालुकाप्रमुख पदी नुकतीच सावळीविहीर बुद्रुक येथील युवक संदीप रमेश विघे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ठिकठिकाणी सत्कार होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
संदीप रमेश विघे यांचा नुकताच राहुरी येथे शिवचिदंबर मंगल कार्यालयामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात लोहर युथ फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
व त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच लोहार समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थी ,विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विशेष सत्कार संदीप विघे यांचा यावेळी करण्यात आला. दशरथ दादा पोपळघट, शांताराम तात्या लोखंडे, राजेंद्र लोखंडे, राजेंद्र लाड, अनिल हिवाळे आदी लोहार युद्ध फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे श्री नर्मदेश्वर सेवाधाम महंत आत्माराम गिरीजी ट्रस्टच्या वतीनेही निर्मळ पिंपरी तालुका राहता येथे श्री नर्मदेश्वर सेवा धाम शिवकुटी येथे मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या हस्ते संदीप रमेश विघे यांचा सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल श्रीफळ व शाल देऊन सन्मान करत आशीर्वाद देण्यात आले. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायती समोर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संदीप रमेश विघे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ओमेश जपे, सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे. विविध ठिकाणी झालेल्या सत्कार व सन्मान कार्यक्रमानंतर संधी रमेश विघे यांनी म्हटले आहे की, ठिकठिकाणी आपणाला मोठ्या प्रेमाने बोलावून शिवसेना तालुका प्रमुख नियुक्तीबद्दल शिवसैनिक, सर्व सामान्य नागरिक व ग्रामस्थांकडून तसेच समाजाकडून सन्मान, सत्कार होत आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आहेत. आपली शिवसेनेच्या (उबाठा) राहता तालुकाप्रमुख पदी झालेली निवड व ठिकठिकाणी होत असलेला सत्कार यामुळे आपणाला समाजात आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा , प्रेरणा मिळाली असल्याचे सांगत नक्कीच समाजासाठी व पक्षासाठी चांगले काम करेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
0 Comments