हरिगांव मळा शेती महामंडळाच्या ९ गावातील अकारी पडीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात या म्हणून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड अजित काळे यांच्यासह महिला पुरुष शेतकरी १४ ऑगस्ट रोजी अन्नत्याग ऊपोषणास बसले होते. आज ऊपोषणाचा तिसरा दिवस असल्याने काही उपोषण कर्त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. ही बातमी समजताच तालुक्यात खोकरफाटा,उंदिरगांव येथे रास्तारोको तर श्रीरामपूर शहरांत कांदा मार्केट जवळ पाण्याचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. या घडामोडी घडत असतानाच . पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ उपोषणस्थळी चर्चेस पाठवूनही मार्ग निघाला नाही. दुपारी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अँड अजित काळे यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या समवेत राधाकृष्ण बोरकर सदा पटारे, शिवाजी दौंड आदी कार्यकर्ते होते.भाजपा माजी तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनीही विधानपरिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांच्याशी व्यासपीठावर भ्रमणध्वनीवर चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले
ना.विखे पाटील यांनी अँड अजित काळे यांनी शासकीय विश्रामगृहात चर्चेसाठी बोलावले. प्रकृती खालावल्याने मी न येता माझे चार सहकारी पाठवित असल्याचे सांगितले. विश्रामगृहात बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी अँड काळे यांना चर्चेचा तपशील दिला. त्या पोपाठोपाठ सकाळच्या शिषटमंडळातील गिरीधर आसने,बाबासाहेब चिडे, डॉ शंकर मुठे,भिमभाऊ बांद्रे यांना पुन्हा पाठविण्यात आले. सकारात्मक चर्चा झाल्याचा संदेश ना.विखे पाटील यांना दिल्यानंतर पालकमंत्री यांचा ताफा वीस मिनिटात उपोषणस्थळी दाखल झाला त्यांच्यासमवेत नितीन दिनकर शरद नवले, राधाकृष्ण आहेर, पोपटराव जाधव आदी कार्यकर्ते होते.
व्यासपीठावर प्रारंभी समोर बसलेल्या हजारो महिला पुरूष अकारी पडित शेतकऱ्यांसमोर कागद पत्रांची पाहणी करत ना.विखे पाटील व अँड काळे यांच्यात बराच वेळ सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याचे अँड अजित काळे यांनी समोर बसलेल्या शेतकऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी अकारी पडीत आंदोलक महिला पुरुष शेतकऱ्यांसमोर बोलताना ना.विखे पाटील म्हणाले की आपल्या भावना समजून घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली . ना.महसुल मंत्री महोदयांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भुमिका घेतली. या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यातच २५ आगष्ट दरम्यान बैठक घेऊन पुढील सर्व प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यासंदर्भात जलदगतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले. त्यानंतर आपली विनंती मान्य करत अँड काळे व सहकाऱी आंदोलकांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आपण महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनीबाबत धोरणात्मक निर्णय करून, त्याचा शासन आदेश काढण्यात यश आले. मागील सरकारने शेतकऱ्यांना जमिनी देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. उच्च न्यायालयात जाऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचे हक्क अबाधित राहावेत म्हणून, वैयक्तिक केलेल्या प्रयत्नांना राज्य सरकारचेसुद्धा पाठबळ मिळाले. शेती महामंडळाच्या जमिनींबाबत असलेल्या संघर्षात मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा होतो. खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग एक करताना शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचले, याकडे लक्ष वेधून ना. विखे पाटील यांनी सांगितले की, अकारी पडीत शेतकऱ्यांना आहे त्या ठिकाणी जमीन देण्याची भूमिका ही शासनाची आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळापुढील प्रस्तावाला मंजुरी घेऊन राज्यपालांकडून त्याला मान्यता घ्यावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती त्यांनी केली.
अकारी पडीत जमिनींच्या संदर्भात मी सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असून, शेतकऱ्यांचा हक्क डावलून कोणताही निर्णय होणार नाही. उद्योजकांना जमिनी देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असला तरी, शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाटप करून, शिल्लक जमीन डिफेन्स क्लस्टरसाठी देण्याची भूमिका आहे. समज, गैरसमज करण्यापेक्षा यापूर्वीसुद्धा खंडकरी शेतकऱ्यांना जमीन दिल्यानंतर गावठाणाच्या विकासासाठी ९०० एकर जमीन उपलब्ध करून दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार मिलींदकुमार वाघ अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे सहा. पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी हजर होते.
विश्रामगृहात चर्चेसाठी गेलेले सचिन वेताळ ,शरद आसने बाळासाहेब बकाल, बाबासाहेब वेताळ, सोपानराव नाईक, बापुसाहेब गुळवे यांच्यासह या ऊपोषण स्थळी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मण वडले, सुधीर बिंदू,रूपेंद्र काले , कार्लस साठे, सागर मुठे, शिवाजी पवार,साहेबराव चोरमल , गोविंद वाघ बंडू चौगुले, राजेंद्र पाऊलबुध्दे,दिलीप गलांडे, संजय दुधेडीया,मनोज दुधेडिया,बाळासाहेब नाईक, राजेंद्र नाईक,भरत आसने,राजेंद्र कोकणे,सुजीत बोडखे, गोरक्षनाथ वेताळ,गंगाधर वेताळ, जितेंद्र चांदगुडे, किरण वेताळ, बबनराव वेताळ, डॉ दादासाहेब आदिक, अंबादास आदिक, नामदेव आदिक, निलेश आदिक, अनिल जगरूपे,संदिप डाखे, रमेश आसने सुनील आसने, बाळासाहेब आसने यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments