कमलपूर येथील जप्त केलेला 100 मुरूम अखेर शिव रस्त्यांसाठी महसूल विभागाने देऊ

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- कमलपूर येथील जप्त केलेला 100 ब्रास मुरूम अखेर महसूल विभागाने कमलपूर येथील रस्ते व शिव रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी दिला, या मुळे अवैधरित्या वाहतूकतुक करून वाळू मुरूम साठे बाजी करण्यावर आळा बसेल, व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी महसूल विभागाचे आभार मानले,

  श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथे चक्रधर स्वामी मंदिराच्या पलीकडे भामाठाण रोड लगत अज्ञात इसमानी 90 ते 100 ब्रास मुरूम टाकला असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळाली त्यावरून महसूल विभागाचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी कर्मचारी समवेत पंचनामा करून सदर मुरूम जप्त केला. सदर ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील रस्ते व शिव रस्ते यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजवण्यासाठी माननीय तहसीलदार यांना खड्डे बुजवण्यासाठी मुरमाची मागणी केली. त्यावर तहसीलदार यांनी जप्त केलेला 100 ब्रास मुरूम ग्रामपंचायत प्रशासनासाठी रस्ते व शिवरस्तेसाठी हा मुरमाचा रस्त्यासाठी रीतसर देऊ केला आहे.या मुळे अवैधरित्या वाहतूकतुक करून वाळू मुरूम साठे बाजी करण्यावर आळा बसेल,
     यासाठी सरपंच सौ स्वाती मुरकुटे तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्करराव मुरकुटे, माजी सरपंच सचिन मुरकुटे उपसरपंच ललिता गोरे,अनिल गोरे, रमेश मुरकुटे, दिलीप मुरकुटे ग्रामपंचायत सदस्य राहुल बारस्कर,किरण गोरे,नंदु शिरसाठ दिगंबर बारस्कर, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने तहसीलदार यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे,

Post a Comment

0 Comments