रूपाली भालेराव
लोणी :स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात तसेच संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी ची संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा येथे बैठक आयोजित करण्यात आली.
होती यावेळी अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदी शंकर कवाणे, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष पदी कल्पना कोळसे, अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी पुजा काकडे, राहुरी तालुकाध्यक्ष पदी गोवर्धन जगताप, राहता तालुकाध्यक्ष पदी शुभम नालकर, राहाता महिला तालुकाध्यक्ष पदी सुनिता अभंग, जिल्हा उपाध्यक्ष पदी पुजा मोरे यांची निवड करण्यात आली तसेच राहाता व राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी संघटनेचे ध्येय धोरणे आणि उद्दीष्टे समजून सांगितले तसेच योग्य ते मार्गदर्शन केले. लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दौरा करून महिला व पुरुष कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे नुतन जिल्हाध्यक्षा कल्पना कोळसे व नुतन शहर जिल्हाध्यक्ष शकंर कवाणे यांनी सांगितले यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव शरदभाऊ परदेशी, उत्तर महाराष्ट्र प्रभारी योगेश सुराणा, उत्तर महाराष्ट्र संघटक समीरभाई शेख, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अलमभाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय वैरागर, जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख संतोष आहेर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तांबे, उपाध्यक्ष विजय सोनवणे, मनिषा सुर्यवंशी, वैशाली अभंग, जालिंदर आल्हाट, संदीप गाडेकर,साईनाथ कोळसे, सुरेश रणसिंग, संपर्कप्रमुख वनिता धीवर, संघटक अल्ताफ शेख, सुनील लोंढे, वैशाली, अभंग, भारती लोंढे, सोनाली लोंढे, काविता महाले, सुप्रिया धकातोडे, नेवासा तालुकाध्यक्ष अरूण चांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. गिताराम बर्डे यांनी उत्कृष्ट असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शरदभाऊ परदेशी यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.
0 Comments