टाकळीभान प्रतिनिधी: नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ते मोठा देवी दिंडीचे मा. उपसरपंच बंडोपंत चौगुले व मित्र मंडळ यांच्या वतीने बेलपिंपळगाव फाटा येथे स्वागत केले. बंडोपंत चौगुले यांच्यावतीने दिंडीस बिस्कीट पुडे वाटप करून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी दिंडीच्या वतीने बंडोपंत चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. दिंडीस प्रा. कार्लस साठे सर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बेलपिंपळगावचे माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले, शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा.कार्लस साठे सर, ज्येष्ठ शेतकरी संघटना नेते हनुमंतराव वाकचौरे, मुमताज भाई सय्यद, उद्योजक रेवणाथ कांगुणे, संदीप कोकणे, संदीप गटकळ, सुनील दारकुंडे, दिंडी चालक शिवाजी शिंदे, बाबासाहेब गायकवाड, बाळासाहेब गटकळ आदीसह भाविक महिला पुवरुष, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments