महात्मा गांधी संकुलाच्या मुलींनी गिरवले निवडणुकीचे धडे..



लोहगाव (वार्ताहर) – निवडणूक प्रक्रिया काय असते, मतदान केंद्र, ईव्हीएम मशीन, मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे याबद्दलचे धडे प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयात नुकतेच वर्गनिहाय धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले.

 लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाली.या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक वर्गाचे वर्गमंत्री मंडळ तयार करण्यात आले. शिक्षकांच्या संकल्पनेतून शालेय वर्गमंत्री मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन केले गेले. मोबाईल वरील ईव्हीएम मशीन मधून प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड तयार निवडणूक घेतली गेली. इच्छुक उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेदवारांना चिन्हे देण्यात आली.
विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याचे धडे वर्गातून इंटरॲक्टिव्ह बोर्डवर देण्यात आले. विद्यार्थ्यांना मॉकपोल दाखवून अधिकारी, एक-दोन-तीन आणि केंद्राध्यक्ष यांच्या उपस्थितीत मतदान गोपनीय पद्धतीने घेण्यात आले.
कामकाज काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बॅलेट बटन दाबताच पसंतीच्या उमेदवारापुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज येतो. ही प्रक्रिया अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. याशिवाय मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन विद्यार्थी भारावून गेले.
मुख्याध्यापिका नलिनी जाधव आणि माधुरी वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया आनंददायी आणि उत्साहात पार पडली. यावेळी संगिता उगले, प्रफुल्ल नव्हाळे, सुजाता ठाकरे, शैलेजा सातपुते, विजयश्री कदम, दिपाली आंबेकर, नंदादेवी बैसाणे, मीनाक्षी गांगुर्डे, कमल थिटे, सुवर्णा भोसले, प्रमिला पंडोरे या सर्व शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम कर्तव्य बजावले. ही प्रक्रिया राबविण्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले. तर पोलीस कर्मचारी वैष्णवी वायाळ आणि सायली हिवाळे यांनी काम पाहिले.
     यावेळी संकुलाचे प्राचार्य विनायक मेथवडे, लोहगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चेचरे, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगिता सांगळे, उपप्राचार्य संजय डुबे, डॉ.शरद दुधाट हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी मुलींच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
       इ.५ वी ते १० वी अखेर गायत्री आवारी, स्नेहल पंडित, संध्या वाघडकर ( बिनविरोध) मानवी गायकवाड, अपेक्षा उबाळे, अर्पिता साळवे, कीर्ती पाटील, वैष्णवी वायाळ, अलिशा शेख, अंतरा सातदिवे या उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Post a Comment

0 Comments