लोणी प्रतिनिधी
लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. छाया संजय गलांडे यांना "डेटा सायन्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नगरपालिका घनकचरा हाताळणी पद्धतींचा अभ्यास व मूल्यांकन" या संशोधन विषयावर केलेल्या अभ्यासासाठी श्री जगदीश प्रसाद झाबरमल टीबडेवाला विद्यापीठाने पीएच.डी.पदवी जाहीर केली आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. प्रसाद पेड्डी यांचे प्रमुख मार्गदर्शन, तर डॉ. बी. बी. आमले यांचे सहमार्गदर्शन लाभले.
प्रा.छाया गलांडे या लोणी महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिताताई विखे पाटील, मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिक्षण संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) प्रदीप दिघे आणि उपप्राचार्य डॉ.राम पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. छाया गलांडे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद,मुलगा मुलगी व जावई यांचे व कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण सहकार्य व पाठबळाला दिले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी -- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments