सोशल मीडिया जातीवाचक व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या टिप्पण्या केल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल



टाकळीभान प्रतिनिधी- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह, जातीवाचक व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या टिप्पण्या केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील एका व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश उर्फ मिठ्ठठ फक्कडराव पिसाळ असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी टाकळीभान येथील शंकर विजय रणनवरे (वय २६) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, दि.१० जुलै रोजी सकाळी ९.४३ वाजता मी येथील एसटी स्टॅण्ड परीसरात असताना माझ्या मोबाईलवर इन्स्टाग्राम सोशल मिडीया साईटवर धनगर समाजाच्या गंगाखेड येथील मोर्चा बाबतचा व्हीडीओ पहात व त्यावरील कमेंट पहात होतो.

त्यावर योगेश पिसाळ यांनी जातीवाचक अश्लिल भाषेत कमेंट टाकल्या होत्या. दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकुर या कमेंटमध्ये होता. मी या कमेंटबाबत माझ्या गावातील समाजाच्या काही लोकांना सांगितले. जातीवाचक कमेंटमुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत.

याच्या विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात या फिर्यादीवरून योगेश पिसाळ (वय ४२) भारतीय न्याय संहीता कलम ३५३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ तसेच अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments