या नवरात्रीमध्ये साधक, तांत्रिक आणि देवीचे भक्त आपली साधना पूर्णपणे गुप्त ठेवतात. साधना व गुप्तता राखल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. अशी माहिती श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महंत श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्ट, पिंपरी निर्मळ येथे श्री नर्मदेश्वर सेवाधाम मध्ये संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज हे आषाढी गुप्त नवरात्री या कालावधीत म्हणजेच बुधवार दिनांक 15 जुलै 2026 ते बुधवार दिनांक 22 जुलै 2026 या कालावधीत उपासना व साधना करणार आहे. हे दुसरे वर्ष आहे.
या आषाढी गुप्त नवरात्री बद्दल व उपासना आणि साधने बद्दल माहिती देताना संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगितले की,
या काळात श्री माता काली, श्री.तारा, श्री त्रिपुर सुंदरी, श्री. भुवनेश्वरी, श्री भैरवी,श्री.छिन्नमस्ता, श्री. धूमावती, श्री.बगलामुखी, श्री. मातंगी आणि श्री.कमला या दहा महाविद्या देवींची आराधना केली जाते. या आषाढी गुप्त नवरात्री काळात सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. आपल्या पूजेच्या ठिकाणी किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावावा. साधक आपल्या इष्ट देवीच्या मंत्रांचा जप करतात. बगलामुखी किंवा वाराही देवीच्या साधनेसाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली मानला जातो.देवीला पिवळी किंवा लाल फुले आणि गोड नैवेद्य अर्पण केला जातो.
या आषाढ गुप्त नवरात्री मध्ये मनोकामना पूर्ती, शत्रू नाश आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या नऊ दिवसांत विशेष अनुष्ठान केले जाते. अशी माहिती मंहत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी दिली आहे. तसेच सर्व भक्तांनी या दिव्य उपासनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महंत श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments