राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक ही एक मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास नानासाहेब जपे यांनी काही दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच या रिक्त पदासाठी शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपसरपंच पदासाठी निवडणूक सभा बोलावण्यात आली होती.या सभेमध्ये गुप्त मतदान प्रक्रियेने उपसरपंच पदाची निवड करण्यात आली .
त्यामध्ये दत्तात्रय जिजाबा आगलावे हे उपसरपंच पदी निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी कार्ले भाऊसाहेब यांनी यावेळी दत्तात्रय जिजाबा आगलावे यांना गुप्त मतदान प्रक्रिया द्वारे 12 सदस्यांची मते मिळाली तसेच विरोधी विकास जपे यांना चार मते मिळाल्याचे जाहीर करत दत्तात्रय जिजाबा आगलावे हे उपसरपंच म्हणून निवडून आल्याचे यावेळी जाहीर केले. नूतन उपसरपंच दत्तात्रय जिजाबा आगलावे यांचा यावेळी सरपंच ओमेश साहेबराव जपे तसेच सर्व उपस्थित सदस्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ओमेश जपे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे व त्यामुळेच गावाचा विकास होत असल्याचे यावेळी सांगितले. तर पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबा आगलावे यांनी यावेळी सांगितले की, राजकारणामध्ये शब्द हा प्रमाण असतो व ठरल्याप्रमाणे दत्तात्रय आगलावे यांना उपसरपंच सर्वांनी केले. त्यासाठी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले तसेच सर्व सदस्य व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले. यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे यांनीही सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायतची निवडणूक होताना ती बिनविरोध व्हावी असा प्रयत्न झाला. त्यावेळी तडजोडीमध्ये ओमेश जपे गटाला सरपंच पद व बाळासाहेब जपे गटाला अडीच वर्षे उपसरपंच पद देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे राजकारणात शब्दाला सर्वांनी जागत विकास जपे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला व नूतन उपसरपंच दत्तात्रय जिजाबा आगलावे यांना केले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे यांनी म्हटले की सावळीविहीर बुद्रुक गावच्या विकासासाठी व दिलेला शब्द पाळण्यासाठी बाळासाहेब जपे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नूतन उपसरपंच पदासाठी सरळ पाठिंबा दिला. यामध्ये कोणताही गटतट न करता थेट पाठिंबा देऊन गावच्या विकासासाठी यापुढेही नेहमी सहकार्य करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नूतन उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली यापुढे गावच्या विकासासाठी चांगले काम करू असे आश्वासन यावेळी देत सर्वांचे यावेळी धन्यवाद मानले. ग्रामविकास अधिकारी कार्ले भाऊसाहेब यांनी निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच विविध कार्यकर्ते पदाधिकारी संस्थेमार्फत उपसरपंच दत्तात्रय आगलावे यांचा पुष्पहार शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments