भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे १ ऑगस्टला आयोजन ---



दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. ३१-- सोयगाव येथील अग्रगण्य असलेल्या भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.०१ ऑगस्ट शनिवारी सकाळी १०:०० वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. 

दरम्यान मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत चा वृत्तांत वाचून कायम करणे, सन. २०२५-२६ या वर्षाचे संचालक मंडळाने मंजूर केलेले आर्थिक पत्रके वाचून मंजूर करणे, सन. २०२५-२६ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, संचालक मंडळांनी शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, ऑडिट दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, चेअरमन यांना मानधन ठरविणे, अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे बँकेचे व्यवस्थापक धनराज औरंगे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्याची परंपरा कायमस्वरूपी राहावी यासाठी वार्षिक सभेस सर्व संचालक व सभासद, निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब काळे, व्यवस्थापक धनराज औरंगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments