दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२--सोयगाव तालुका खरेदी विक्री संघात ज्वारी खरेदी करण्यासाठी रीतसर नोंदणी करूनही शेतकऱ्यांना वेठीस धरून ज्वारी खरेदी साठी शेतकऱ्यांच्या नावात अफरातफर व टाळाटाळ केल्याचा आरोप जरंडीच्या शेतकऱ्यांनी केला असून या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी दि.०१ बुधवारी सोयगाव तहसील कार्यालयात व तालुका खरेदी विक्री संघात लेखी निवेदनात केली आहे.
जरंडी येथील शेतकऱ्यांनी सोयगाव तालुका खरेदी विक्री संघात ज्वारी खरेदी करण्यासाठी रीतसर नोंदणी केली मात्र त्या शेतकऱ्यांचा नोंदणी क्रमांक वगळून त्यांच्या नावाच्या मागील व पुढील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करून या दहा शेतकऱ्यांना ज्वारी खरेदी करण्यासाठी वंचित ठेवण्यात आले आहे यामध्ये घोळ असल्याचा आरोप थेट शेतकऱ्यांनी करून बुधवार सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बी. टी. बेंडवाल यांची भेट घेतली व निवेदन दिले त्यानंतर या प्रकाराची सखोल चौकशी साठी सोयगाव तहसील कार्यालयात धाव घेवून निवेदन दिले या निवेदनात नमूद केले आहे की तालुका खरेदी विक्री संघात ज्वारी खरेदी मध्ये घोळ केला आहे संबंधित शेतकऱ्यांना ओ टी पी न देता नोंदणी असूनही खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करून या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे निवेदनावर लोकेश पाटील,श्रीराम चौधरी, गणेश चौधरी, गजानन चौधरी, रवींद्र तायडे,शंकर बोरसे,आदींसह दहा शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments