दिलीप शिंदे
सोयगाव दि.२६-- आषाढी एकादशी निमित्ताने सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळे पासून आमखेडा येथिल विठ्ठल रूख्मिणी मंदीरा पर्यत टाळ मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली होती.
या दिंडी मध्ये विठ्ठलाची वेशभुषा कु. खुशी निकुंभ, कु. योगीता बोलखेडे व रुख्मिणी मातेच्या वेशभूषेत कु.मनश्री गाजरे, कु. प्रतीक्षा राऊत यांनी सुंदर अशा वेशभुषा परीधान केल्या होत्या यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विद्यार्थीनीनी विठ्ठल भक्त गोरा कुंभार याच्यावरील नाटीका सादरीकरण करून तसेच विठ्ठल रूख्मिणी मंदीरावर विठ्ठल भक्तीच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण करून उपस्थित भक्तगणाचे मन जिकंली याच बरोबर विद्यार्थी गऴयात टाळ डोक्यावर टोपी, तर विद्यार्थीनी पातळ परीधान करून बाल वारकरी याच्या वेशभुषा परीधान केल्या होत्या.यावेळी विठ्ठल नामात शाळेचा व मंदीराचा परीसर दुमदुमला होता.शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, वेशभुषा, त्यांच्यातील सप्त कलागुणांना वाव मिळावा,शालेय शिक्षण उंचावे यासाठी शाळा सदैव विविध उपक्रम राबवित असल्याचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.दरम्यान शालेय विद्यार्थ्यांची दिंडी यशस्वितेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान सोनवणे याच्यासह मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सुरेखा चौधरी, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, सविता पाटील,अकुश काळे, अनिल देसाई, विवेक महाजन, तानाजी देसाई, शुभम देसले, पुनम लाड यानी परिश्रम घेतले.
0 Comments