जुने कर्जदार यांना कर्जातून मुक्त करावे अन्यथा शेतकरी संघटना त्यांच्यासाठी मोठी आंदोलन उभारणार.. विठ्ठलराव शेळके


राहाता तालुका प्रतिनिधी 

सरकारने 2019 च्या कर्जमुक्तीतून राहीलेल्या पूर्वीच्या शेतकऱ्याचा समावेश कर्जमुक्तीत करून सतत वंचीत असलेल्या जुने कर्जदार यांना कर्जातून मुक्त करावे अन्यथा यांच्यासाठी राज्यामध्ये मोठे अंदोलन छेडले जाईल असा इशारा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे दिला आहे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की सततचा दुष्काळ अतीवृष्टी या नैसगि॔क अपत्तीने शेतकऱ्याचे गेली दहा वर्षापासून नुकसान होत आहे केंद्र व राज्य सरकारने शेतमालाची निर्यात बंद करून कुठल्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव न मिळाल्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला गेली दहा वर्षात हजोरो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आजही शेतकरी आत्महत्या करत आहे सरकार शेतकऱ्यांना झुलवत आहे आज शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाही ग्रामीण भागातील शेतकरी कुंटुबातील मुले शहरात व इतर राज्यात नौकरी साठी बाहेर जात आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय हा पुर्ण तोटयात आहे भविष्यात शेती पिकवली नाही तर लोकांना उपासमारीची वेळ येईल कर्जमुक्ती विषयी मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस व राज्यातील मंत्री आमदार यांनी ही कर्जमुक्ती सर्वात जास्त आहे असे बोड॔ लावले यात अनेक शेतकरी वंचीत आहे राज्यात शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सात बारा कोरा करावा असे अंदोलन छेडले त्यावेळी सरकारने चुकीचे आधीकारी चुकीचे लोकप्रतीनिधी घेऊन समिती गठीत केली या समितीने अनेक अटी शर्ती लावून अहवाह दिला हा चुकाचा असल्यानै पुन्हा उद्रेक होऊन अंदोलन पेटले शेतकरी एकजुट होयला सुरवात झाली आणि सरकारने 30 जुन पुर्वी दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती करू असे जाहीर मागिल आठवठ्यात एक यादी प्रसिद्ध केली त्यात अनेक चुका केल्या यात अनेक शेतकरी वंचीत रहाणार आहे शिवाय या कर्जमुक्तीत जुन्या कर्जदार शेतकरी वंचीत दिसत आहे तरी कुठल्याही शेतकरी वंचीत रहाणार नाही याची दक्षता सरकारनी घ्यावी अन्यंथा या प्रश्नावर आमदार खासदार मंत्री यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा विठ्ठलराव शेळके यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments