राजुरी (वार्ताहर): प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित डॅा विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रूग्णालय लोणी, माजी सभापती नानासाहेब पवार प्रतिष्ठान, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व टाकळीभान ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ३७५ नागरिकांनी आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अशोक कारखान्याचे माजी संचालक भाऊ थोरात, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, रमेशदादा धुमाळ, उपसरपंच कान्हा खंडागळे, सोसायटीचे अध्यक्ष राहुल पटारे, माजी अध्यक्ष एकनाथ पटारे, भाऊसाहेब पवार, सुधीर मगर, नारायण काळे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, अनिल दाभाडे, संजय पवार, नानासाहेब लेलकर, विलास सपकाळ, बाळासाहेब शेळके, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिरादरम्यान प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना 'आयुष्मान भारत कार्ड' देखील शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रूग्णालय संचालक डॅा. योगिंदर सिंग,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, व्यवस्थापन अधिकारी विलास घुले, जोसेफ मकासरे, डॉ. राहुल सिद्धये, डॉ. स्वप्निल अंबड, डॉ. शार्दुल गवांडे व डॉ. समृद्धी शिंदे यांनी परिश्रम घेतले. यशस्वी शिबिराबद्दल प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रशासन उपसंचालक ध्रूव विखे पाटील यांनी अभिनंदन केले.
0 Comments