संतविचारांच्या चिमुकल्या पाऊलखुणांतून..... उजळली मिरपुर लोहारे आषाढी वारी!*

संगमनेर (तालुका प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील मिरपुर लोहारे 
आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरपुर येथे भक्ती, संस्कृती आणि संस्कारांचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला.

 चिमुकल्या वारकऱ्यांनी *संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, वासुदेव तसेच विठ्ठल–रुक्मिणी यांच्या मनोहारी वेशभूषेत* बाल दिंडी काढत परिसर "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" च्या गजराने दुमदुमून टाकला.
        विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या *आकर्षक नृत्याविष्कारांनी* उपस्थितांची मने जिंकली. शेवटी *वारीच्या महाप्रसादाने* या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली. संस्कार, संस्कृती आणि भक्तीचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात *वारकरी परंपरेचे बीज रुजवणारा* ठरला.
मिरपूर लोहारे जिल्हा प्राथमिक शाळा बाळ गोपाल दिंडी सोहळाआयोजक प्राध्यापक जगधने सर जगधने मॅडम गाडगे मॅडम वेळापूरकर मॅडम व उपस्थित गावकरी.

Post a Comment

0 Comments