दिलीप शिंदे
सोयगाव दि.२५--सिल्लोड तालुक्यातील बहुली ( नवीन वस्ती)या गावी मारुती मंदिराच्या दोन एकर जमिनीत अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील हे हरितवन उभारत आहे.
तेथे त्यांच्या मदतीने आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी व हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या अजान वृक्ष,सुवर्ण पिंपळ, वड, उंबर,कदंब,देव बाभूळ अशा दहा प्रजातीच्या देव वृक्षांचे रोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थांनी गावातून हरित दिंडीही काढली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चोरमले गुरुजी सहशिक्षक सूर्यवंशी, जेष्ठ नागरिक रमेश पा. सोन्ने, डॉ. पाटील,प्रभत पा. पिसाळ, विष्णू सोनवणे, भिकन सोन्ने, श्याम गाडेकर, पंडित पिसाळ, प्रमोद सोन्ने, योगेश गाडेकर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments