दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीला दिलेली अमूल्य भेट होय."वृक्ष हे मानव जीवनाचे आधारस्तंभ असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, शुद्ध प्राणवायू, अन्न, औषधे व नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे सोमवारी वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनावर आधारित प्रभावी नाटिका सादर करून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा सर्वांना मिळाली. याच कार्यक्रमात चौथी व सहावी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती अनिताताई मोटे या होत्या. तर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी पंचायत समितीचे सभापती उत्तमभाऊ चव्हाण,सदस्य राहुल राठोड, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उप नगराध्यक्षा सुरेखाताई काळे, गटविकास अधिकारी अमोल जगताप, गटशिक्षणाधिकारी अक्षय धांदर, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील, केद्रप्रमुख फिरोज तडवी, शलेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान सोनवणे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष रवींद्र काळे, बाबू शहा, दत्तू रोकडे, मयूर मनगटे, दत्तात्रय सोनी, मुख्याध्यापक दादाराव राठोड, भास्कर चौधरी, मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, वरंध सर, धनराज बापू यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या यशस्वी कार्यक्रमातून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव यांनी पर्यावरण संवर्धन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि संस्कारक्षम शिक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणला. विशेष म्हणजे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शाळा शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरणपूरक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यात आदर्श ठरत असून, त्यांच्या कार्याचे उपस्थित सर्व मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला बोरसे यांनी केले, तर श् महाकाल यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी संघ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
0 Comments