टाकळीभान येथील जिल्हा परिषद दाभाडे वस्ती शाळेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष (शाळा विविध सुविधांपासून वंचित)..

दिलीप लोखंडे 

टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून गावामध्ये जिल्हा परिषदेची एक मुख्य केंद्र शाळा व तीन वस्ती शाळा आहे. गावच्या विकासामध्ये चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असणाऱ्या शाळा भर घालत असतात. जिल्हा परिषद शाळा या शैक्षणिक व्यवस्थेच्या मूलभूत पाया आहेत.

 परंतु या शैक्षणिक व्यवस्थेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामध्ये गावातील दाभाडे वस्ती शाळेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले असून शाळा विविध सुविधांपासून वंचित झाली आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासावर व प्रगतीवर यामुळे परिणाम होत असून ग्रामपंचायतने या शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शासकीय शाळांची पटसंख्या घटत असून काही शासकीय शाळा बंद होत आहेत. ही शासकीय शैक्षणिक व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असून ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळेच्या विकासासाठी निधी खर्च करणे गरजेचे आहे. 
       या दाभाडे वस्ती शाळेसाठी संबंधित शिक्षकांनी ग्रामपंचायतकडे विविध कामांसाठी वारंवार प्रस्ताव दाखल करून देखील ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायतच्या दुर्लक्षा बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दाभाडे वस्ती शाळेच्या प्रांगणाला पूर्ण संरक्षण भिंत झाली नसून आसपासच्या रहिवासी लोकांचा अतिक्रमणचा धोका होण्याची शक्यता बळावत आहे. त्याचप्रमाणे शाळेसाठी मुलांना खेळणी साहित्याची मागणी करूनही मिळत नाही तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची सुविधा नसल्याने पिण्या योग्य स्वच्छ पाण्याची उणीव भासत आहे.तसेच शाळेला संगणकाची आवश्यकता असून विविध भौतिक सुविधांची कमतरता या शाळेत भासत आहे. तरी ग्रामपंचायतने दाभाडे वस्ती शाळेच्या विकासासाठी मागणीप्रमाणे प्रस्ताव मंजूर करून येथील शाळेचा कायापालट करावा,व येथील शाळेचा दर्जा सुधारावा अशी शाळेच्या सुज्ञ

Post a Comment

0 Comments