निसर्ग पर्यावरण मंडळाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार विजय बोडखे यांची निवड.

शिर्डी (वार्ताहर )निसर्ग व पर्यावरण वाढवण्याची आपली जबाबदारी असून प्रत्येक कुटुंबाने एक वृक्ष लावून आपली जबाबदारी पूर्ण करावी असे प्रतिपादन राज्य प्रसिद्धी प्रमुख विजय बोडखे यांनी व्यक्त केले आहे. राहता तालुक्यातील राजुरी येथील पत्रकार व ज्येष्ठ छायाचित्रकार विजय बोडखे यांची निसर्ग पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून नुकतीच निवड करण्यात आली .

असून तसे पत्र निसर्ग पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद (दादा) मोरे यांनी दिले आहे. पत्रकार व छायाचित्रकार विजय बोडखे हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या संघटनेमध्ये कार्यरत असून स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अनेक संमेलन झाले असून यामध्येही त्यांनी भाग घेतला होता .तसेच दरवर्षी 5 जून रोजी राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण डॉ अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा होत असतो या वेळीही राळेगणसिद्धी येथे अनेक दिवसापासून पत्रकार विजय बोडखे यांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या कामाची धडपड पाहून मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी त्यांना राज्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड पत्र दिले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच राहता तालुका छायाचित्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष दिलीप धावणे,अशोक तांबे, शंकर तांबे,सुभाष कडू,विकास कांगुणे, आसिफ शेख,वैभव फुणगे,श्याम जाधव,संतोष गोरे,अशोक सावंत,सुनील वैद्य,प्रभाकर नवाळे,गोरक्ष दिवटे,तसेच प्रवरा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण,पत्रकार कोंडीराम नेहे,प्रकाश औताडे. ,प्राध्यापक रवींद्र काकडे,साईप्रसाद कुंभकर्ण,दादासाहेब म्हस्के,संजय शिवलेकर,सुहासजी वैद्य,शंकर सोनवणे,शहाजी दिघे,प्रवीण बेंद्रे,प्राध्यापक डॉ अनिल बेंद्रे राजकुमार गडकरी लखण गव्हाणे 
,यांच्यासह राजुरी येथील ग्रामस्थ,युवक,निसर्ग पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे सर्व ज्येष्ठ सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments