गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथमदिनी श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकुट व सुवर्ण 'ॐ' दान अर्पण!

राजकुमार गडकरी 

शिर्डी ( प्रतिनिधी)- श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भक्तिभावाने ते श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिनी, मंगळवार दि. २८ जुलै २०२६ रोजी, मध्यप्रदेश राज्‍यातील जबलपूर येथील साईभक्त श्री. ए. के. शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरणी ४८ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाची किंमत रुपये ६ लाख २८ हजार ७५२ इतकी आहे.

तसेच, गुजरात राज्यातील वडोदरा येथील साईभक्त श्री. विजय बालकृष्ण नाईक यांनी श्री साईबाबांच्या चरणी २५.५३० ग्रॅम वजनाचे दोन आकर्षक सुवर्ण 'ॐ' अर्पण केले. या सुवर्ण 'ॐ'ची किंमत रुपये ३ लाख ३४ हजार ४१७ इतकी आहे.
भाविकांकडून अर्पण करण्यात आलेले हे सुवर्ण अलंकार त्यांच्या श्री साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेचे, निस्सीम भक्तीचे आणि समर्पण भावनेचे प्रतीक आहेत.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्तांचा सत्कार करून त्यांच्या भक्तीभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथमदिनी श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकुट व सुवर्ण 'ॐ' दान अर्पण!

Post a Comment

0 Comments