टाकळीभान येथे शेतकऱ्याच्या दोन शेळ्या चोरी

दिलीप लोखंडे 

टाकळीभान- प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील खिर्डी रस्त्यालगत मायकल प्रभाकर रणनवरे यांच्या पंचवीस हजार रुपयांच्या किमतीच्या दोन शेळ्या चोराने चोरून नेल्या, 
     काल पहाटेच्या दरम्यान मायकल प्रभाकर रणनवरे यांच्या घरा शेजारून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या चोरीस गेल्या आहेत व चोरांनी रणनवरे यांच्या घराला बाहेरून दोन्ही दरवाजांना कडी लावलं , मायकल रणनवरे उठले असतात ,त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाज्याला बाहेरून कडी लावली असल्यामुळे, चोर दोन शेळ्या घेऊन प्रसार झाले, 
      काही दिवसापूर्वी टाकळीभान पोलीस स्टेशन समोरून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल दिवसा चोरून नेली ,त्याचा सुद्धा अद्याप तपास लागलेला नाही , शेतकऱ्यांचे नेहमीच विद्युत इलेक्ट्रिक मोटर पंप,स्प्रिंकलर , बोअरवेल मधील पंप सेट व यांच्या अनेक वेळा चोऱ्या झाल्या आहेत , सोमवारच्या आठवडे बाजारात अनेक मोबाईल चोरी होत आहे,त्यांचाही अजून पर्यंत तपास लागला नाही,टाकळीभान पोलीस दूर क्षेत्रात पोलीस हजर राहत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसा विषयी नाराजी व्यक्त होत आहे,

Post a Comment

0 Comments