टाकळीभान प्रतिनिधी :
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सहकारी सोसायटीच्या लाभार्थी सभासदांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती २०२६ योजनेचा लाभ मिळाला असून सदर पात्र लाभार्थी सभासदांची पहिली यादी नूकतीच येथील सेवा संस्थेमध्ये चेअरमन राहुल पटारे, मंजाबापू थोरात, भरत क्षिरसागर यांच्या उपस्थितीत प्रकाशीत करण्यात आली. यामध्ये तब्बल २७६ लाभार्थी सभासदांना २ कोटी ८७ लाख ४८ हजार ४७४ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती २०२६ योजना राबविली. सदर योजनेअंतर्गत
टाकळीभान येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, बिग बागायतदार सोसायटी, संत सावता माळी सोसायटी मधील लाभार्थी सभासदांना कर्जमाफी मिळाली असून त्या सभासदांची पहिली यादी नूकतीच संस्थेच्या सभागृहात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २७६ लाभार्थी सभासदांना २,८७,४८,४७४/ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. याप्रसंगी भास्करराव कोकणे, दत्तात्रय नाईक, मधूकर कोकणे, भाऊसाहेब मगर, अविनाश लोखंडे, विजय कोकणे, एकनाथ पटारे, रोहीदास बोडखे, नंदू रणनवरे, सुबोध माने, अशोक रणनवरे, रवि शिरसाठ, सचिव रामनाथ ब्राम्हणे, संजय ब्राम्हणे, विठ्ठल बनकर आदी उपस्थित होते.
0 Comments