जरंडी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस,सोयगाव-बनोटी रस्त्यावरील वाहतूक ठप्प,खडकी नदीला पूर,सोयगाव तालुक्यातील घटना----



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२४--सोयगाव तालुक्यातील जरंडी सह परिसरात दि.२४ बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून सुरु झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने जरंडी शिवारात हाहाकार उडाला होता. दरम्यान गावालगत असलेल्या जरंडीच्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजता पूर आल्याने पुराने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला होता त्यामुळे वाहतुक पाच तास ठप्प झाली होती. जरंडीगावालगत असलेल्या खडकी नदीच्या पुराने सोयगाव-बनोटी-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.तर गावाबाहेरील याच याच रस्त्यावरील पूल वाहून गेल्या मुळे सोयगाव-चाळीसगाव- संपर्क तुटला आहे.

 दरम्यान ग्रामपंचायतीने या रस्त्यावरील रहदारी ठप्प असल्याचा सूचना दिल्या आहेत जरंडी परिसरात बुधवारी झालेल्या दोन तासांच्या ढगफुटी सदृश पावसाने नव्याने दुतर्फा रस्त्याचे सिमेंटी करणं सुरू आहे परंतु या रस्ता च्या संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील नाल्यांचे पाणी आणि वळण रस्ते पक्के न केल्याने जरंडी ते सोयगाव या रस्त्या दरम्यान वळण रस्तेही वाहून गेले आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाहनधारकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान जरंडी च्या खडकी नदीला पहिलाच पूर आला असून या पुराने पाच तास वाहतूक ठप्प झाली होती मात्र तालुक्यात इतर भागात मध्यम पाऊस झाला आहे 
दरम्यान जरंडी शिवारात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने नुकत्याच जमिनी बाहेर आलेल्या कोवळ्या अंकुरांना पाण्याने वेढा घातला आहे.

Post a Comment

0 Comments