दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४-- सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या कु .वेदिका गणेश पवार जरंडी या विद्यार्थिनीने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच सानिका विशाल महाजन,रिद्धी हेमंत पाटील, अनुष्का समाधान पाटील,कोमल पाटील,निधी पाटील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आरंभ कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. योगेश काळे प्रा. प्रणय कुलकर्णी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिज्ञासू वृत्तीच्या बळावर हे यश मिळविल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, क्लासच्या संचालकांनी विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात अधिक प्रगती करून आपल्या शाळेचे, पालकांचे व परिसराचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले. आगामी स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी असेच उल्लेखनीय यश संपादन करावे अशी अपेक्षा आरंभ कोचिंग क्लास च्या संचालकांनी व्यक्त केली.
0 Comments