दिलीप शिंदे
सोयगाव दि.१८ -- छत्रपती संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत मतदान केंद्र स्थापित करण्यात आले होते.दि.१८ गुरुवारी मतदान केंद्रात २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यात १९ नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सभापती असे २३ जणांनी मतदान केले.
मतदान केंद्राध्यक्ष तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान मतदान केंद्राबाहेर भाजपा जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रभाकर काळे(आबा) काळे, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील,जयप्रकाश चव्हाण , पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे , मयूर मनगट,विजय गव्हाड, मौलाना आझाद महामंडळाचे उपाध्यक्ष शेख जावेद,शहर प्रमुख संतोष बोडखे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, गटनेते अक्षय काळे, कुसुम दुतोंडे,भगवान जोहरे आदींसह नगरसेवक व भाजपा-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान मतदान केंद्राबाहेर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक गजानन आरेकर, पोलिस उपनिरिक्षक (फर्दापूर) चंद्रकांत पाटील,गजानन दांडगे, अजय कोळी, संजय बांमदे,समाधान बारी,कुणाल जाधव,तायडे, कुंडकर, मिर्झा,मपोका मिस्तरी, फर्दापूर पोलिस मंडपे, नेवर,तडवी, उबाळे, डहाके ,गृहरक्षक दलाचे सागर राऊत,अरुण वाघ,रमेश चेक्के, ऋषि काळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments