टाकळीभान ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडतीत गदारोळ



सभा रद्द करण्याची मागणी, सोडत मान्य नसल्यास अपिल दाखल करा मंडळाधिकारी

टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम काल १० जून रोजी ग्रामसचिवालयाच्या सभागृहात अध्यासी अधिकारी मंडालाधिकारी रोहिणी आघाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभाग ५ च्या सोडतीवरुन सभेत चांगलाच गदारोळ झाला. यावेळी सभा रद्द करण्याची मागणी काही उपस्थितांनी केली.
       रखडलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सदस्य निवडणूक प्रक्रिया टप्याटप्याने पुढे जात आहे. काल प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम टाकळीभान महसूल मंडाळाधिकारी आघाव यांच्या मंडळाच्या रोहिणी अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्र. १मध्ये सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, अनु. जाती स्त्री. प्रभाग २ मध्ये नामाप्र पु., सर्वसाधारण पु. सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्र. ३ मध्ये अनु. जमाती पु., अनु. जाती स्त्री, सर्साधारण स्त्री. प्रभाग ४ मध्ये अनु. जाती पु. व सर्वसाधारण पु. प्रभाग ५ मध्ये अनु. जाती पु., नामात्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री. प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण पु., नामाप्र स्त्री व सर्वसाधारण स्त्री अशी आरक्षण सोडत मंडळाधिकारी आघाव यांनी जाहीर केली.
१७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामंचायतीत ९ महिला व ८ पुरुष सदस्य असणार आहेत. प्रभागातील लोकसंख्येच्या निकषानुसार व आरक्षित प्रभागात ५० टक्क्याची मर्यादा ठेवून सर्वसाधारण पुरुष ४, सर्वसाधारण स्त्री ५, अनु. जाती पुरुष २, अनु. जाती स्त्री २, नामाप्र पुरुष १, नामाप्र स्त्री २ तर अनु, जमाती पुरुष १ जागेवर प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत सरपंच पद अनु. जमाती पुरुषासाठ
आरक्षित झाले असल्याने यंदा सरपंचपद प्रभाग ३ ला मिळणार आहे. या सोडतीवेळी काही प्रभागातील आरक्षणात बदल झाला नसल्याने घडाळाच्या काट्याप्रमाणे प्रभाग आरक्षण करावे, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. याच मुद्यावर काही वेळ चांगलाच गदारोळ झाला. काही इच्छुकांची त्या त्या प्रभागात संधी हुकल्याने गदारोळ आणखीनच वाढला. त्यामुळे आजची प्रभाग आरक्षण सोडत मान्य नसल्याने आजची सभा रद्द करुन पुन्हा आरक्षण सोडत सभा घेण्यात यावी, अशी मागणी झाली. गदारोळादरम्यान अध्यासी अधिकारी तथा मंडळाधिकारी रोहिणी आघाव यांनी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करुन ज्यांना आरक्षण सोडत मान्य नसेल त्यांनी त्यावर वरिष्ठांकडे हरकत घ्यावी, असा सल्ला दिला.       
      यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, भाऊसाहेब पवार,माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, शेतकरी संघटनेचे प्रा. कार्लस साठे, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, संत सावता सोसायटीचे विलास दाभाडे, प्रा. जयकर मगर, भाजपाचे नारायण काळे, अक्षय कोकणे, मोहन रणनवरे,, अनिल बोडखे, भाऊसाहेब गव्हाणे, भाऊसाहेब पटारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कामगार तलाठी रुपाली रामटेके, ग्रामविकास आधिकारी भिंगारदे यांनी याकामी सहकार्य केले.

चौकट -प्रभाग आरक्षण सोडत ही शासकीय परिपत्रकातील तत्वांना अनुसरुन केलेली आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलंडता २०११ ची ९ हजार ९६३ लोकसंख्या गृहीत धरुन प्रभागातील आरक्षण त्या प्रभातील लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने टाकण्यात आले आहे. नामाप्रच्या लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार पूर्णांक घेण्याची परिपत्रकात तरतूद असल्याने नामाप्रची १ जागा कमी झालेली आहे. या आरक्षण सोडतीवर ज्यांना हरकती घ्यायच्या असतील त्यांनी हरकत कालावधीत हरकती घ्याव्यात. - रोहिणी आघाव, मंडळाधिकारी, महसूल विभाग.
-

Post a Comment

0 Comments