शासकीय विश्रामगृहात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचा एल्गार
संगमनेर -- उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील बौद्ध समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली.ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखालीज झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करून आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली उपस्थितांनी एकाजुटीने लोकशाही मार्गाने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस, ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव, माणिकराव यादव, आशिष शेळके, बाळासाहेब गायकवाड,कैलास कासार, ॲड. किरण रोहम, राजू खरात, प्रवीण गायकवाड,अनिल भोसले,किशोर चव्हाण, विनोद गायकवाड,बंटी यादव, के. जी.भालेराव, रवी गिरी,सचिन साळवे,गणेश बोऱ्हाडे संदीप दारोळे आदिसंह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने २ जुलै २०२६ रोजी संगमनेर शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मोर्चाला सुरुवात होऊन नवीन नगर रोडवरील प्रांतकार्यालयात पोहचल्यावर प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरीही तालुक्यातील सर्व भीमसैनिक व समाजबांधवांनी आपली एकजूट व ताकद
दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
0 Comments