दिलीप शिंदे
सोयगाव दि.१५-- सोयगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१५ सोमवारी शाळा प्रवेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, स्वागतगीत व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या पुष्पाताई काळे,प्रमुख पाहूने म्हणून गटविकास अधिकारी अमोल जगताप, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड यांची उपस्थिती होती.
यावेळी शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच शासकीय शैक्षणिक योजनांची माहिती पालकांना देण्यात आली. शाळेत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी
मुख्याध्यापक तडवी, शिक्षक किरण पाटील ,श्रीमती.मंगला बोरसे,पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले.दरम्यान जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी उत्कृष्टरीत्या केले. शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments