दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अमली पदार्थमुक्त युवा – सुदृढ भारत या संकल्पनेवर आधारित जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना नकार द्या, निरोगी जीवनाचा स्वीकार करा,व्यसनमुक्त युवा, राष्ट्राची खरी शक्ती" अशा घोषणा देत परिसरात जनजागृती केली.
याप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. हा कार्यक्रम व रॅली यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील चौधरे, दीपक पारधे व डॉ. शिवाजी शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
0 Comments