शेवटी सत्याचाच विजय झाला-अहिरे कोट्यावधींच्या बेकायदेशीर बांधकामावर पडणार हातोडा

पारनेर तालुका प्रतिनिधी 

ढवळपुरी तालुका पारनेर येथील आदिवासींच्या जमिनीवर कोट्यावधी रुपयांच्या बेकायदेशीर बांधकामावर शासनाचा हातोडा पडणार असून ही जमीन मूळ मालकांना परत मिळणार असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तसेच आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
         या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करणारे एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की, शेवटी सत्याचाच विजय होणार होता तो झाला आहे. आदिवासी जमीन बळकावून या जमिनीवर मुनिंदर ट्रस्ट सतलोक आश्रम यांनी कोट्यावधी रुपयांचे भव्य दिव्य असे बांधकाम केले आहे. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून ही जमीन आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक कागदाचा पाठपुरावा केला. परंतु यामध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात गुंतलेले असल्याने खूप अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी आदिवासींच्या न्यायहक्कासाठी पारनेर तहसील कार्यालया समोर आदिवासींना घेऊन बेमुदत उपोषण करावे लागले. त्यानंतर शासन खडबडून जागे झाले आदिवासींचा वाढता दबाव पाहता सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पारनेर तहसीलदारांनी भुमिअभीलेख अधिकाऱ्यांना मोजणी करून सदर जमीन आदिवासींच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.त्यामुळे हा आदिवासींचा खूप मोठा विजय झाला असून आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या जमिनीवर खोट्यावधींचे बांधकाम झाले आहे त्यामुळे जमिनीची मोजणी झाल्यानंतर या सर्व बांधकामावर शासनाचा हातोडा पडणार आहे. त्यामुळे आदिवासींनी सुरू केलेल्या आंदोलनाला खूप मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाजाने सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments