कपिला नदी महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत राज्याचे कुंभमेळा मंत्री तथा नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच नाशिक येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी "एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया, भविष्य घडवूया" हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच नदी स्वच्छता आणि निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणप्रेमी संस्था, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली.
या कार्यक्रमाला श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्टचे संस्थापक संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांनीही उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन ट्रस्टच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली.
कार्यक्रमाचा समारोप "स्वच्छ नदी – हरित पर्यावरण" या संकल्पनेचा दृढ संकल्प करून करण्यात आला. या कार्यक्रमाला वृक्षप्रेमी नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नाशिक येथे कपिला नदी महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम ना. महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न!
0 Comments